इतर
मी हे पुस्तक लिहिलं नसतं तर माझ्यासाठी बरं झालं असतं. फार फार बरं झालं असतं. हे लिहिणं मला नको इतकं महागात पडतंय. किती प्रयत्न करते आहे, आठवायचा, पण आठवतच नाहीय, माझ्यावर पहिल्यांदा अत्याचार कधी झाला. मला जे आठवतं आहे, तीच पहिली वेळ होती की त्याआधीही असं घडलं होतं, आणि मी ते बाहेर येऊच दिलेलं नव्हतं. …